Advertisement

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे.

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
SHARES

मुंबईत (mumbai) गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असून, दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. मुंबई महापालिका (bmc) क्षेत्रात गेल्या २४ तासांत १ हजार २४० नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र, तब्बल अनेक दिवसांनंतर म्हणजेच ९ मार्चनंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे.

मुंबई महापालिका आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी १ हजार २४० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर त्याचवेळी २ हजार ५८७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. गेल्या २४ तासांत मुंबईत ४८ रुग्ण दगावले असून, आतापर्यंत या आजारानं १४ हजार ३०८ जणांना प्राणास मुकावं लागलं आहे.

मुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं असून रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्के इतका खाली आला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल २४६ दिवसांवर गेला आहे. सध्या करोनाचे ३४ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी कोरोनाच्या एकूण १७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या, अशी माहितीही देण्यात आली.

मुंबईत चाळी व झोपडपट्टीत सध्या ७७ कंटेनमेंट झोन आहेत तर ३११ इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाचा ग्राफ खाली येत आहे. मुंबईत जवळपास ३०० रुग्णांची घट झाली तर मृतांचा आकडाही घटला. रविवारी मुंबईत १ हजार ५४४ नवीन रुग्ण आढळले होते व ६० रुग्ण दगावले होते. त्याजागी सोमवारी १ हजार २४० नवीन रुग्ण आढळले तर ४८ जणांचा मृत्यू झाला. सलग ५ दिवस मुंबईत २ हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ४ एप्रिल रोजी एकाच दिवसात ११ हजार १६३ इतकी उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली होती.



हेही वाचा -

Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी

Cyclone Tauktae : 'तौक्ते'मुळं राज्यात ६ जणांचा मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा