Advertisement

रखरखत्या उन्हाचा पशुपक्ष्यांना त्रास

उन्हामुळे पक्ष्यांनाही डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. परिणामी कुठे विजेच्या तारांना अडकून तर कुठे झाडांच्या फाद्यांवरून खाली पडून पक्षी जखमी होत आहेत. रस्त्यावरील भटकी कुत्रे, मांजरी या प्राण्यांनाही प्रामुख्याने डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.

रखरखत्या उन्हाचा पशुपक्ष्यांना त्रास
SHARES

फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. या तापमानवाढीचा त्रास मनुष्यासह पक्षी, प्राण्यांनाही होत आहे. त्यामुळेच सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.


डिहायड्रेशनचा त्रास

उन्हामुळे पक्ष्यांनाही डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. परिणामी कुठे विजेच्या तारांना अडकून तर कुठे झाडांच्या फाद्यांवरून खाली पडून पक्षी जखमी होत आहेत. रस्त्यावरील भटकी कुत्रे, मांजरी या प्राण्यांनाही प्रामुख्याने डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.



किती पशुपक्ष्यांवर उपचार

याविषयी बैलघोडा रुग्णालयाचे सचिव डॉ. जे.सी. खन्ना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या २ महिन्यांत ३५० ते ४०० प्राणी आणि पक्ष्यांवर प्राथमिक उपचार केल्याची माहिती दिली. एवढंच नाही, तर ५० ते ६० पशुपक्ष्यांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.



कुणाचा समावेश?

प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उन्हाचा सर्वांधिक त्रास होतो. यात कबुतर, घुबड, कावळा, घार, पोपट, कोकीळा आणि सीगल पक्ष्यांचा समावेश आहे. “उपचार करण्यात आलेल्या पक्ष्यांमध्ये कबुतरांची (६० ते ६५ टक्के) संख्या अधिक आहे. तर, इतर पक्ष्यांची संख्या ३० ते ३५ टक्के आहे. या पक्ष्यांना ग्लुकोज आणि प्रतिजैविकांचा डोस दिल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सोडून दिलं जात असल्याचं डॉ. खन्ना यांनी सांगितलं.


पक्ष्यांसाठी काय कराल?

  • उन्हाळ्यात मटण किंवा चिकनसारखे गरम खाद्यपदार्थ खाण्यासाठी देऊ नयेत
  • घर किंवा इमारतीवर पाण्याची भांडी भरून ठेवावीत
  • पाण्यात ग्लुकोज टाकल्यानं पक्ष्यांसाठी फायदेशीर ठरेल
  • पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत
  • उन्हाळ्यात पक्ष्यांचं घरटं तोडू नका.
  • कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवावीत
  • पक्षांना खाऊ म्हणून दाणे ठेवावेत
  • तेलकट पदार्थ देणं टाळावं
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा