Advertisement

बेस्टच्या सर्व बसेस २०२७ पर्यंत इलेक्ट्रिक असतील - आदित्य ठाकरे


बेस्टच्या सर्व बसेस २०२७ पर्यंत इलेक्ट्रिक असतील - आदित्य ठाकरे
SHARES

पर्यटन आणि परायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २०२७ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील, असं अश्वासन मुंबईकरांना दिलं आहे. राज्याच्या पर्यावरणासंदर्भात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी जगभरात पर्यावरणाच्या बाबतीत राज्य सरकारांमध्ये  सर्वाधिक चांगलं काम महाराष्ट्रानं केलं आहे. प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले. गेल्या १० वर्षातील नैसर्गिक आपत्ती ही वातावरणीय बदलामुळे आली आहेत. 

एनर्जी व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील प्रदूषण कमी करावे लागेल. जिथं दुष्काळ होता, तिथं आता अतिवृष्टी होताना दिसते आहे. पश्चिम किनारपट्टीवर कधी वादळे येत नसते, पण वर्षभरात दोन ते तीन वादळे येवून गेली आहेत. ऋतू बदलत आहेत, तसं आपल्यालाही बदलावं लागेल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.  

२५० मिमी पाऊस एका दिवसात पडला तर कुठलंही शहर हे सोसू शकणार नाही. मनुष्य स्वत:ला ताकदवान समजतोय. पण डायनासोरही पूर्वी ताकदवान होताच की. पण निसर्गापुढं तोही लूप्त झाला. त्यामुळं डायनासोर व्हायचं नसेल तर बदलायला हवे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबईत एका वर्षात कचरा १० हजार टनांवरून ६५०० हजार टनांवर आला आहे. ईलेक्ट्रिक व्हेईकल धोरणामुळं ईव्ही गाड्यांचे प्रमाण राज्यात वाढलं आहे. २०२७पर्यंत बेस्टच्या सर्व बसेस ईलेक्ट्रीक असतील, असे यावेळी आदित्य ठाकरे यांमी म्हटलं. 

वर्षाजवळील वादळात झाड पडल्यानं मुख्यमंत्र्यांना खूप दु:ख झालं. ते कोवीड काळात रोज त्या झाडाकडे पाहत असायचे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे स्मारक बनवताना एकही झाड न कापण्याचा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा