आता पीओपीच्या मूर्ती 3 दिवसांत पाण्यात विरघळणार


SHARE

प्लॅस्टर ऑफ पॅरीस म्हणजेच पीओपी पासून साकारण्यात आलेल्या बाप्पांच्या मूर्ती पाण्यात विरघळली जात नाही. त्यामुळे या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने पर्यावरण पुरक अशी उपाय योजना आखली आहे. या मूर्ती पाण्यात विरघळवण्यासाठी पालिकेने प्रायोगिक तत्वावर एक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विसर्जनानंतर 3 दिवसातच या पीओपीची गणेशमूर्ती विरघळेल, असा दावा पालिकेने केला आहे.


नवीन तंत्र अवलंबलं

पुण्यातील राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) पीओपीपासून साकारण्यात आलेल्या मूर्तीला पाण्यात विरघळवण्यासाठी एक नवीन तंत्र अवलंबण्याचं ठरवलं आहे. ज्यामध्ये अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे मूर्ती तीन दिवसांत विरघळण्यास मदत होईल, अशी माहिती प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी दिली. याव्यतिरिक्त याचा बागेसाठी खत म्हणूनही वापर होऊ शकतं का? यावर अधिक तपासणी सुरू आहे.


2.77 लाखांचा खर्च

यासंदर्भात मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालिकेकडे शिफारस केली होती. त्याचप्रमाणे, मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या एच आणि जी दक्षिण वॉर्डमध्ये प्रत्येकी एक तलाव बांधला जाणार आहे. जेथे अमोनियम बाइकार्बोनेटचा वापर करण्यात येईल. दरम्यान, पालिकेने केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) मध्ये 2.77 लाख रुपये खर्चून 15 टन अमोनियम बाइकार्बोनेट उपलब्ध करून देईल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या