Advertisement

मुंबईत सोमवारीही मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता

सोमवारी जोरदार पावसाची शक्यता असल्याने समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

मुंबईत सोमवारीही मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता
SHARES

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच ठिकठिकाणी पाऊस पडल्याने हवेतील गारवा वाढला. मात्र, रविवारची सुट्टी असल्याने पावसाचा फटका मुंबईकरांना बसला नाही. मात्र भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारीही मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

सोमवारी जोरदार पावसाची शक्यता असल्याने समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.


रविवारचा पाऊस

रविवारी मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही काळासाठी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी पुन्हा जोर पकडला. दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा ओसरला.


चौघे बुडाले

पालघर तालुक्यातील केळवे बीचवर नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन येथून ७ जण केळवे समुद्रावर फिरायला आले होते. या ७ जणांपैकी चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) आणि दिपक परशुराम चालवाडी (२०) असं या तरुणांची नावं असून दिपक याचा मृतदेह सापडला आहे. तसेच तिन जणांचा शोध सुरू आहे.


हेही वाचा -

दुर्देवी! रत्नागिरीच्या समुद्रात बुडून बोरीवलीतील ५ जणांचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा