Advertisement

Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! पावसाचा धोका वाढला, ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने नवा अलर्ट दिला आहे.

Mumbai Rains : मुंबईकरांनो सावधान! पावसाचा धोका वाढला, ऑरेंज अलर्ट जारी
SHARES

मागील काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस सुरु आहे. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (Indian Metrological Department) दिला आहे.

मुंबईसह परिसरातील यलो अलर्ट आता बदलून ऑरेंज अलर्ट झाला आहे. म्हणजेच याठिकाणी देण्यात आलेला धोक्याचा ईशारा आता आणखी वाढला आहे. तसंच या सर्व ठिकाणी पुढील काही दिवस आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.

यंदा काहीशी उशीरा पावसाला सुरुवात झाली असली तरी आता कोकण किनारपट्टी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात धो-धो पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसंच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे.

नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास 20 ते 30 मिनिटं उशीराने सुरु आहेत. वाशी, बेलापूर, खारघर, पनवेल परिसरात धुवांधार पाऊस कोसळत आहे. या सर्वामुळे शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली जाऊ लागले आहेत. वाढत्या पावसामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांना काळजी घेणं अनिवार्य झालं आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबई (कुलाबा) - 27 मिमी
मुंबई (सांताक्रुज) - 19.2 मिमी
ठाणे - 59 मिमी
डोंबिवली - 104 मिमी



हेही वाचा

आरेतच उभारणार मेट्रो कारशेड प्रकल्प, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

पावसाळ्यानिमित्त MMRDA कडून कंट्रोल रुम्सची स्थापना, 'इथे' करा संपर्क

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा