Advertisement

मुंबई, ठाण्यासह 'या' भागात पुढील काही तास पावसाची शक्यता, IMD चा इशारा

घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आयएमडी मुंबईने म्हटले आहे.

मुंबई, ठाण्यासह 'या' भागात पुढील काही तास पावसाची शक्यता, IMD चा इशारा
SHARES

पुढील तीन ते चार तासांत, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील निर्जन भागात विजांच्या कडकडाटासह वादळी, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आयएमडी मुंबईने म्हटले आहे.

मंगळवारी पहाटेपासूनच ठाणे, गोरेगाव, बोरिवली भागात पावदानं दमदार हजेरी लावली. तर पुढील काही क्षणांतच हा पाऊस दादर, परेल आणि दक्षिण मुंबईच्या दिशेनं सरकताना दिसला. वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, त्यात पावसाच्या सरी अशीच एकंदर परिस्थिती असल्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना काही अडचणींचा सामना करावा लागला. (Mumbai Rains) 

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मंगळवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या भागात अचानक पावसाच्या सरी बरसू लागल्या. याशिवाय विक्रोळी, घाटकोपर परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. ठाण्यात पहाटेपासूनच दमदार पाऊस झाला. (Maharashtra Weather Update) 

पहाटे 4 वाजल्यापासूनच ठाण्यात पाऊस कोसळत होता. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह ठाण्यात पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा आल्याचं जाणवलं.

साधारण साडेसहाच्या सुमाराला पावसाचा जोर ओसरला असला तरीही काही भागांत मात्र काळ्या ढगांची चादर आणि पावसाची रिमझीम अद्यापही सुरुच आहे. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा