Advertisement

लॉकडाऊन सोबतच 'या' कारणांमुळे कार्बन उत्सर्जन घटलं

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) च्या संशोधकांनी या मागे आणखी एक कारण असल्याचं सांगितलं आहे.

लॉकडाऊन सोबतच 'या' कारणांमुळे कार्बन उत्सर्जन घटलं
SHARES

भारतात मागील ४० वर्षात पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. परंतू, हे कमी होण्यामागे फक्त लॉकडाउन हे कारण नाही. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) च्या संशोधकांनी मंगळवारी सांगितलं की, लॉकडाउनमुळे विजेची मागणी कमी झाली आहे. रिन्यूएबल एनर्जीचा वापर वाढल्यामुळे जीवाश्म इंधनाची मागणीदेखील कमी झाली आहे.

संशोधकांनुसार, भारतात कार्बन उत्सर्जनच्या ३७ वर्षांच्या ट्रेंडला बदललं आहे. २०१९ च्या सुरुवातीपासूनच भारतात थर्मल पॉवरची मागणी कमी झाली आहे. देशात मार्चमध्ये कार्बन उत्सर्जन १५% कमी झालं. एप्रिलमध्ये 30% पर्यंत कमी होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

संशोधकांचे म्हणणं आहे की, लॉकडाउननंतर भारतात विजेची मागणी कमी झाली आहे. यामुळे कोळशाची मागणीदेखील कमी झाली आहे. कोळशापासून होणाऱ्या विजेच्या उत्पादनात मार्चमध्ये १५% आणि एप्रिलच्या तीन आठवड्यात ३१% कमी आली आहे. तसंच, रिन्यूएबल ऊर्जेची मागणी मार्चमध्ये ६.४% वाढली आणि एप्रिलमध्ये १.४ % कमी झाली आहे.

सीआरईएच्या संशोधकांचे म्हणणं आहे की, कोळशाची मागणी लॉकडाउनपूर्वीच कमी झाली होती. यावर्षी मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षादरम्यान कोळशाची २% विक्री कमी झाली. तेव्हापासून आतापर्यंत यात १०% घट झाली आहे. तसंच, आयातदेखील २७.५% कमी झाली आहे.

इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीकडून एप्रिलमध्ये जारी आकडेवारीनुसार, जगभरात कोळशाच्या उत्पादनात ८% घट झाली आहे. तसंच, जानकारांचे म्हणणं आहे की, जीवाश्म इंधनच्या मागणीत कमी नेहमीसाठी राहणार नाही. लॉकडाउन हटवल्यानंतर थर्मल पॉवरची मागणी आणि कार्बन उत्सर्जन परत वाढेल.

देशात तेलाची मागणीदेखील कमी झाली आहे. मार्चमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत १८% मागणी कमी झाली आहे. आर्थिक वर्षादरम्यान मागणी फक्त २% वाढली, जी २२ वर्षातील सर्वात हळू झालेली वाढ आहे. यादरम्यान कच्चा तेलाचं उत्पादनदेखील ५.९% आणि रिफायनरीच्या उत्पादनात १.१% घट झाली.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा