Advertisement

बॉटल रिसायकलिंग मशीन धूळ खात


 बॉटल रिसायकलिंग मशीन धूळ खात
SHARES

चर्चगेट - पश्चिम रेल्वेने मोठा गाजावाजा करत चर्चगेट रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेली बॉटल रिसायकलिंग मशीन वापराविना धूळ खात पडले आहे.
जागतिक पर्यावरण दिनी 5 जून रोजी पश्चिम रेल्वेने हे बॉटल रिसायकलिंग मशीन चर्चगेट स्थानकात बसवले होते. मात्र हाताळण्यास कोणीही व्यक्ती नसल्याने ही मशीन वापराविना पडून आहे.
रेल्वे ट्रॅकवर फेकण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांना आळा घालण्यासाठी ही मशीन बनवण्यात आली होती. या मशीनमध्ये रिकामी बॉटल टाकल्यास एक कूपन मिळते. मात्र ही मशीन हाताळण्यास व्यक्ती नसल्यामुळे ती सध्या बंद अवस्थेत आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन म्हापूतकर यांना विचारले असता, "ते यंत्र आहे बिघडणारच. याआधी मशीन हाताळण्यासाठी एक व्यक्ती नेमण्यात आली होती. आता मशीन बंद असल्यास ती लवकरच सुरू कऱण्यात येईल", असे त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा