Advertisement

तौंते चक्रीवादळग्रस्तांना २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह ठाणे, पालघर जिल्ह्यांत तौत्के चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.

तौंते चक्रीवादळग्रस्तांना २५२ कोटी रुपयांची मदत जाहीर
SHARES

तौंते चक्रीवादळा (tauktae cyclone)मुळे राज्यातील किनारपट्टीच्या भागात असलेल्या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) सह ठाणे, पालघर जिल्ह्यांत तौत्के चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.

या नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारनं (Maharashtra Government) आर्थिक मदत जाहीर (financial help) केली आहे. राज्य मंत्रिमडळाच्या आज झालेल्या बैठकीतनंतर मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी याची माहिती दिली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, तौत्के चक्रीवादळग्रस्तांसाठी आम्ही २५२ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार ७२ कोटी रुपयांचा एकूण नुकसानीचा आकडा आला होता.

यात राज्य सरकारनं स्वत:च्या तिजोरीतून १८० कोटी रुपये अधिकचे घालून मदत जाहीर केली आहे. लवकरच या मदतीचं वाटपही सुरू करण्यात येईल.

नवे निकष लावल्यामुळे कोकणवासियांना अधिक मदत दिली जाणार आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सरकार अधिकचा निधी देत मदत देत आहे.

अजूनही काही पंचनामे शिल्लक आहेत, त्यामुळे या मदतीत आणखी वाढ होऊ शकते अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

गुजरातमध्ये तौंते चक्रीवादळ आल्यावर कुठलीही मागणी न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजारो कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधानांनी राज्याचा दौराही केला नाही आणि मदतही जाहीर केली नाही.

कोकणातही येऊन पंतप्रधानांनी भेट देऊन मदत जाहीर करावी, अशी आमची विनंती आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.


हेही वाचा

पदपथांवर झाडं लावू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

१६ वर्षांच्या मुलाची कमाल, कॅमेरात कैद केले चंद्राचे फोटो

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा