Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

Cyclone Tauktae: तौंते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘इतकं’ नुकसान

तौंते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Cyclone Tauktae: तौंते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘इतकं’ नुकसान
SHARES

तौंते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५ कोटी ७७ लाख ४५ हजार ११७ रुपयांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात एकूण २ हजार ६० घरांचं अंशतः तर १२ घरांचं पूर्णतः नुकसान झालं आहे. तर १३९ गोठ्यांचं, १९ शाळांचं, ११ शासकीय इमारतींचं, १३ शेड्सचं, ४ सभागृहाचं आणि इतर ५३ ठिकाणी अंशतः नुकसान झालं आहे. 

तर ७८२ विद्युत पोल अंशतः आणि ९८ पोल पूर्णतः पडले आहेत. ३०५ विद्युत वाहिन्यांचं नुकसान अंशतः नुकसान झालं असून १ विद्युत वाहिनीचं पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.

याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील १ हजार ८८६ घरांचं अंशत: नुकसान तर ५ घरांचं पूर्ण नुकसान झालं आहे. एकूण ३ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचबरोबर २ प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- Cyclone Tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम

पंचनाम्याचं काम सुरू

तौंते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचं काम सुरू झालं आहे. जिल्ह्यात सरासरी १३२.११  मिमी तर एकूण ११८९  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड ५२ मिमी, दापोली ८२ मिमी, खेड ४९ मिमी, गुहागर १२० मिमी, चिपळूण १०० मिमी, संगमेश्वर १४२ मिमी, रत्नागिरी २७४ मिमी, राजापूर २०८ मिमी, लांजा तालुक्यामध्ये १६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

‘इतक्या’ नागरिकांचं स्थलांतर

तौंते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील १३ हजार ३८९ नागरिकांचे सुरक्षित स्थळी  स्थलांतरण करण्यात आलं होतं.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४५६३ ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९०, रायगड जिल्ह्यातील ८३८३, ठाणे जिल्ह्यातील ५३ आणि पालघर जिल्ह्यातील २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

(damage in sindhudurg ratnagiri and raigad due to cyclone tauktae)

 
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा