Advertisement

महाराष्ट्रात उन्हाची काहिली, देशात 10 उष्ण शहरांमध्ये राज्यातील 5 शहरं

राज्यात आता उन्हाची काहिली वाढू लागली आहे. मे महिना सुरू झाल्याने उकाडा चांगलाच वाढली आहे.

महाराष्ट्रात उन्हाची काहिली, देशात 10  उष्ण शहरांमध्ये राज्यातील 5 शहरं
SHARES

राज्यात आता उन्हाची काहिली वाढू लागली आहे.  मे महिना सुरू झाल्याने उकाडा चांगलाच वाढली आहे. देशातल्या सर्वाधिक तापणाऱ्या 10 शहरांमध्ये 5 शहरं ही महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये अकोला देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विदर्भातल्या अकोल्यात 44.8  इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

स्कायमेटने देशात सर्वाधिक तापमान असणाऱ्या टॉप 10 शहरांची माहिती दिली आहे. राजस्थानातलं चुरूमध्ये देशात सर्वात जास्त 45.2 एवढं तापमान नोंदलं गेलं आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस उकाडा वाढत चालला आहे. काही ठिकाणी उकाडा तर काही अवकाळी पाऊस पडत आहे. 15 जून पर्यंत हे तापमान असंच राहण्याची शक्यता आहे.

तर राज्यातल्या अनेक भागात वादळी वारे, गारपीट आणि पाऊस होत आहे. पुढच्या काही दिवसांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातल्या या बदलाचा परिणामही तब्येतीवर होत असतो. कोरोनाच्या संकट काळात या बदलामुळे लोकांना तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

 महाराष्ट्रातील 5 तापणारी शहरं

अकोला – 44.8

अमरावती – 44.2

परभणी - 44.2

नांदेड – 44

वर्धा – 44


हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा