सध्या मुंबईत हलक्या पावसाच्या सरी बरसत असल्या तरी २५ सप्टेंबरपासून हळुहळू मुंबई परिसरात मान्सून पुन्हा 'माघारी' परतण्यास सुरूवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागा (आयएमडी) ने वर्तवला आहे.
२० आणि २२ सप्टेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांत पाऊस पडल्यानंतर मान्सून माघारी परतू लागेल, तर २५ सप्टेंबरपासून मुंबई आणि आसपासच्या भागातून मान्सून परतीच्या मार्गाला लागेल. परंतु 'माघारी' परतण्यापूर्वी मुंबईतसहित महाराष्ट्राच्या काही भागांत हलका पाऊस होईल, मात्र जोरदार पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा 'आयएमडी' चा अंदाज आहे.
पावसाची धार कमी झाल्याने मुंबईत आॅगस्ट महिन्यामध्ये केवळ सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. सुदैवाने मान्सूनच्या सुरूवातीलाच चांगला पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा
जमा झाला आहे.
हेही वाचा-
मुंबईकरांचं पाण्याचं टेंशन खल्लास