Advertisement

‘वायू’चा जोर वाढणार, पाऊस लांबण्याची चिन्हे

चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यातच ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी जोर पकडण्याची शक्यता असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस लांबू शकतो, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

‘वायू’चा जोर वाढणार, पाऊस लांबण्याची चिन्हे
SHARES

मुंबईत सोमवारी रात्री वीजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने मुंबईकर खूश झाले आहेत. परंतु हा मान्सूनपूर्व पाऊस नसल्याचा खुलासा हवामान खात्याने केला. चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यातच ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी जोर पकडण्याची शक्यता असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस लांबू शकतो, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

उकाड्यापासून दिलासा

उकाड्यामुळे त्रासलेल्या मुंबईकरांना सोमवारच्या पावसाने थोडाफार दिलासा मिळाला. मुंबईसह उपनगरात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सीएसटी, दादर, परळ, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, घाटकोपर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इ. भागात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. परंतु हा पाऊस मान्सूनपूर्व किंवा मान्सूनचा पाऊस नसून अरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भाग, लगतचा लक्षद्वीप आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पडल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. 

समुद्र खवळणार

त्यातच अरबी समुद्रात तयार झालेलं 'वायू' चक्रीवादळ जोर पकडण्याची शक्यता असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील पावसाचे आगमन काही दिवसांनी लांबणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान समुद्र खवळणार असल्याने माच्छिमारांनी ११ आणि १२ जून रोजी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे. बुधवारी अरबी समुद्रात सुमारे ताशी १२०-१३५ किमीच्या वेगाने, तर महाराष्ट्राजवळील समुद्रात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहतील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.



हेही वाचा-

पावसाळ्यात झाडाखाली उभं राहू नका; पालिकेचा मुंबईकरांना सावधानतेचा इशारा

अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, मासेमारांना सतर्कतेचा इशारा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा