Advertisement

सर्वाधिक प्रदूषित शहरात मुंबई ४थ्या स्थानावर


सर्वाधिक प्रदूषित शहरात मुंबई ४थ्या स्थानावर
SHARES

सर्वात धावपळीचं शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबई शहराची ओळख आता सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणूनही झाली आहे.

मुंबई ही जगाच्या नकाशावर चौथं सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय, मुंबईतील १० पैकी ९ लोक प्रदूषित हवेने श्वासोच्छवास घेत असल्याचंही समोर आलं आहे.

डब्ल्यूएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या हवेतील प्रदूषणाच्या चाचणीत मुंबई सर्वाधिक प्रदूषित असल्याचं निष्पन्न झालं आहे. तर, जगाच्या यादीत दिल्ली शहर‌ पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी मुंबई पाचव्या क्रमांकावर होती. पण यावर्षी, शहरातील हवा प्रदूषणात आणखी वाढ होऊन आता मुंबई चौथ्या स्थानावर आहे.


डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार

डब्लूएचओच्या अहवालानुसार, दिल्ली, कैरो, ढाका आणि त्यानंतर मुंबई अशी पहिल्या ४ प्रदूषित शहरांची नावं आहेत. त्यामुळे, जगातील दर १० माणसांपैकी ९ लोक प्रदूषित हवेनं श्वासोच्छवास करत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. शिवाय, दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहितीही या अहवालातून उघड झाली आहे.


प्रदूषित हवेमुळे होणारे आजार

हवा प्रदूषणामुळे हृदयासंबंधीच्या समस्या, श्वसन रोग यांसारख्या समस्यांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे आता घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावं असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा