Advertisement

पुन्हा खालावली मुंबईतील हवेची गुणवत्ता

'सफर' या संस्थेने सोमवारी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजली. या चाचणीत मुंबईतील वायू प्रदूषणाचा निर्देशांक २६७ अंकांवर जाऊन पोहोचला होता. मुंबई उपनगरातील बोरीवली, वांद्रे, मालाड, अंधेरी, बीकेसी आणि माझगाव या ठिकाणी हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' या श्रेणीतील होती.

पुन्हा खालावली मुंबईतील हवेची गुणवत्ता
SHARES

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. सोमवारी मुंबईतील बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा 'वाईट' या मानकाच्या आसपास होता. मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेली पायाभूत प्रकल्पांची कामे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत आहे. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे.


गुणवत्ता चाचणी

'सफर' या संस्थेने सोमवारी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी मोजली. या चाचणीत मुंबईतील वायू प्रदूषणाचा निर्देशांक २६७ अंकांवर जाऊन पोहोचला होता. मुंबई उपनगरातील बोरीवली, वांद्रे, मालाड, अंधेरी, बीकेसी आणि माझगाव या ठिकाणी हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' या श्रेणीतील होती. या सर्व ठिकाणांवर पीएम २.५ चा स्तर 'वाईट'हून खालच्या दर्जाचा होता.


वाढतोय गारवा

मुंबईच्या हवेतील गारवा हळूहळू वाढत चालला आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत तापमान घट झाल्याने मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई, पालघर, ठाणे इ. परिसरात देखील थंडी जोर धरत आहे.हेही वाचा-

यामुळे अवतरला मुंबईत गारवा!

आरे काॅलनीतील आग ६ तासांनंतर नियंत्रणात, संशयाचा धूर मात्र कायमRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा