Advertisement

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली आहे. मागील १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली
(Representational Image)
SHARES

मुंबईच्या हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली आहे. मागील १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. सोमवारी माझगाव येथील हवेने तीव्र प्रदूषण श्रेणीची मर्यादा ओलांडली होती, तर इतर ठिकणीही मोठ्या प्रमाणवर प्रदूषण दिसून येत होते.

सोमवारी माझगाव इथं ४९५ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. कुलाबा इथं ३०२, अंधेरी आणि चेंबुर इथं प्रत्येकी ३१८ तर मालाड इथं ३६१ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा अतिवाईट श्रेणीत होती. बोरिवली, वरळी आणि भांडुप येथील हवा वाईट श्रेणीत होती. २३ जानेवारीलाही अशाचप्रकारे धुलिकणांच्या वादळाचा परिणाम दिसून येत होता.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत असणे अपेक्षित आहे; मात्र यंदाच्या हिवाळ्यात हवेचा दर्जा अतिवाईट श्रेणीपर्यंत घसरला. राजस्थान, अफगाणिस्तान यांच्या सीमेवर धुलिकणांचे वादळ निर्माण होऊन पश्चिमी प्रकोपामुळे ते अहमदाबादमधून मुंबईपर्यंत पोहोचले.

सोमवारी कुलाबा येथे २७ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. येथे सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ३ आणि ४ अंशांची घट झाली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा