मुंबईत (mumbai) सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी धुके पसरलेले पाहायला मिळाले. सध्या शहरातील हवेची गुणवत्ता पातळी कमी झाली आहे. आदल्या दिवशी रविवारीही हवेत मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले होते. मालाडस्थित केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेधशाळेने हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत असल्याचा अहवाल दिला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक 137 वर पोहोचला आहे.
आर्द्रता वाढल्याने तसेच वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे सोमवारी सकाळी मुंबईतील हवेची गुणवत्ता (mumbai air quality) तिसऱ्यांदा खालच्या पातळीवर घसरली. सकाळी 8 वाजता नोंदवलेला AQI 131 होता, जो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार 'मध्यम' म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे.
27 ऑक्टोबर रोजी, मुंबईची सर्वात खराब वायू प्रदूषण पातळीची नोंद झाली. 202 च्या AQI सह 'निकृष्ट' म्हणून वर्गीकृत करण्यात आले. या प्रदुषित हवेमुळे बहुतेक लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
शहरातील इतर अनेक मॉनिटरिंग स्टेशन्सनी रविवारी 'मध्यम' श्रेणीतील AQI पातळी नोंदवली. 'मध्यम' AQI श्रेणी 101-200 पर्यंत वर्गीकृत केलेली आहे. यामुळे फुफ्फुस, दमा किंवा हृदयाची स्थिती असलेल्या व्यक्तींना श्वासोच्छवासाच्या समस्या निर्माण करू शकतात.
हेही वाचा