Advertisement

मुंबई मेट्रो करणार ९ हजार झाडांचं मियावाकी पद्धतीने रोपण

तीन महिन्यांच्या कालावधीत विविध स्थानिक प्रजाती जसे काथ, कडुलिंब, आवळा, बकुळ, सीता अशोक, चिंच, अर्जुन, बदाम आदी ९००० वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रो करणार  ९ हजार झाडांचं मियावाकी पद्धतीने रोपण
SHARES

मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉपोरेशन ऑफ महाराष्ट्र (एफडीसीएम) यांच्यामध्ये नुकताच एक करार झाला आहे. या कराराअंतर्गत गोरेगाव परिसरातील इनॉर्बिट मॉलजवळ ३००० चौ.मी. भूखंडावर ९००० झाडांचं मियावाकी पद्धतीनं रोपण केलं जाणार आहे.

याबाबत मेट्रो रेल कॉपोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल म्हणाले की, या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत एफडीसीएमच्या साहाय्याने मियावाकी पद्धतीचा वापर करत अत्यल्प कालावधीत घनदाट वन निर्मिती केली जाणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी आमच्या हरित धोरणानुसार ही मोहीम राबविली जाणार आहे.

या मोहिमेत तीन महिन्यांच्या कालावधीत विविध स्थानिक प्रजाती जसे काथ, कडुलिंब, आवळा, बकुळ, सीता अशोक, चिंच, अर्जुन, बदाम आदी ९००० वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. एफडीसीएम पुढील दोन वर्ष या झाडांची मशागत करणार आहे.

यावेळी एफडीसीएम नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक, पी.टी. मोराणकर, मुं.मे.रे.कॉ चे कार्यकारी संचालक (नियोजन), आर. रमणा, एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक, के. बी. भवर, मेट्रो रेल कॉपोरेशनचे सल्लागार (स्थापत्य), श्रीनिवास नंदरगीकर, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक (पर्यावरण), अजय फुलमाळी; पर्यावरण वैज्ञानिक, संदीप सोहनी आणि एफडीसीएमचे सहाय्यक व्यवस्थापक, एस. डी. गोरे उपस्थित होते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा