Advertisement

बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली, मुसळधार पावासाची शक्यता

शनिवार आणि रविवारी मुंबई आणि कोकण भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली, मुसळधार पावासाची शक्यता
SHARES

मुंबईकरांना या विकेंडला अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पाच दिवसांच्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी मुंबई आणि कोकण भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे. बुधवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. 

IMD नुसार मुंबई, ठाणे आणि पालघरच्या वेगळ्या भागांमध्ये ७ जूनपासून हलका ते मध्यम पाऊस पडेल.

मुसळधार पावसाची शक्यता

“पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव पुढील २४ तासात आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे IMD अधिकाऱ्याने सांगितले. 

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीच्या भागातही दमट हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. तसेच  ७ जूनपासून पाच दिवसांचा इशारा जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग येत्या पाच दिवसांत 80 किमी प्रतितास ते 155 किमी प्रतितास राहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनली आहे, तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रात या वर्षी निर्माण झालेले बिपरजॉय हे पहिले वादळ आहे. 

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळ वेगाने तीव्र होत आहेत आणि हवामान बदलामुळे त्यांची तीव्रता दीर्घ कालावधीसाठी टिकवून ठेवली आहे.

“हवामान बदलामुळे महासागर आधीच गरम झाले आहेत. अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की मार्चपासून अरबी समुद्राचे तापमान जवळपास 1.2 अंश सेल्सिअसने वाढले आहे. अशा प्रकारे, चक्रीवादळ बिपरजॉयसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे चक्रीवादळ दीर्घकाळ टिकून राहिल,” अशी माहिती मेरीलँड विद्यापीठ आणि IIT बॉम्बेचे प्राध्यापक रघु मुर्तुगुड्डे यांनी दिली. संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा