मुंबईत पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पाऊस होणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहर आणि उपनगरात वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना महत्वाचे आवाहन केलं आहे. भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने मुंबईला शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पालिकेने असेल तरच घराबाहेर पडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केलं आहे.
⛈️🚨 भारतीय हवामान केंद्र, कुलाबा यांच्या वतीने, मुंबई महानगराला उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 25, 2024
🙏 या पार्श्वभूमीवर, मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाकडून विनंती करण्यात येते की, कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे आणि…
मुंबईत पहाटेपासून मुसळदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावासाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.
लोकल सेवा उशिराने धावत आहेत. झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या कोसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. तर मुंबईत पुढील 24 तास मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा