Advertisement

Mumbai Rains : बुधवार-गुरुवार मुंबईत अतिवृष्टी, IMDचा इशारा

सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबईला पावसानं झोडपलं. आता पुढचे २४ तास मुंबईकरांसाठी अधिक धोक्याचे असणार आहेत, असा इशारा IMD नं दिला आहे.

Mumbai Rains : बुधवार-गुरुवार मुंबईत अतिवृष्टी, IMDचा इशारा
SHARES

बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात राज्याच्या उत्तरेस तयार झालेली चक्रवाती वर्तुळाकार स्थिती दक्षिणेकडे सरकत असून, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक केलाय. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईतल्या काही भागांमध्ये जवळपास ३०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील १० वर्षातील ऑगस्ट महिन्यात नोंद झालेला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे.

हवामान विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. दादर, वरळी, मलबार हिलसारख्या भागांमध्ये जवळपास ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत सर्वच ठिकाणी ११५ मिमीपेक्षा अधिक म्हणजेच अतिमुसळधार पाऊस सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेपर्यंत झाला.



हेही वाचा

Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा