Advertisement

पुढील 5 दिवस मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

23 ते 29 जून दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 5 दिवस मुंबई आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
SHARES

राज्यात हवामान बदल होत आहेत. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आजपासून २२ जूनपर्यंत मुंबईसह तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंतच्या काही ठिकाणी हलक्या ते मध्यम मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

रविवारी दुपारी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या जिल्हा पातळीवरील पूर्वानुमानानुसार कोकण विभागात गुरुवारपर्यंत पावसाचा वेग वाढण्याची शक्यता नाही.

पालघर, ठाणे, मुंबई येथे २२ जूनपर्यंत हलक्या सरींचाच अंदाज आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम सरींची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव येथे कोरड्या वातावरणाचीही शक्यता आहे.

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार, मंगळवारी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या तीन-चार दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

22 जूनपर्यंत हा मान्सूनपूर्व पाऊस कोकण आणि गोवा उपविभागांपुरताच मर्यादित राहू शकतो, असेही हवामान विभागाने वर्तवले आहे. 

मान्सूनपूर्व पावसाच्या प्रचलित स्थितीमुळे नैऋत्य मान्सून 23 जून रोजी अरबी समुद्राच्या शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात आणि 23 जून रोजी बंगालच्या उपसागरातून तेलंगणातून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. 

23 ते 29 जून दरम्यान तळ कोकणासह संपूर्ण कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा