Advertisement

पावसाची सोमवार विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद


पावसाची सोमवार विश्रांती; ११६.१ मिलीमीटरची नोंद
SHARES

मुंबईत हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारीपासून सलग ३ दिवस म्हणजे रविवारपर्यंत पावसानं तुफान हजेरी लावली. या पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं. मात्र सलग कोसळणाऱ्या पावसानं अखेर सोमवारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार विश्रांती घेतली. सोमवारी सकाळपासून पाऊस मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांतीवर होता. पावसाच्या अधून-मधून सरी कोसळत होत्या.

रविवारी दिवसासह रात्री कोसळलेल्या पावसाची सोमवारी सकाळी ८.३० वाजता तब्बल ११६.१ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. १ ते ५ जुलैपर्यंतच्या पावसाची नोंद पाहिली असता या काळात मुंबई शहरात १७०.४ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात यावेळी ३९१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस १३० टक्के आहे.

मुंबईच्या उपनगरात १ ते ५ जुलै या काळात सर्वसाधारण १७६.६ मिलीमीटर पावसाची नोंद होते. आता ३८५.१ मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे. हा पाऊस ११९ टक्के एवढा आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबईत पावसानं विश्रांती घेतली. पावसामुळं पडझडीच्या घटना घडतात. यंदा ८९ ठिकाणी झाडे कोसळली. ३१ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

भांडूप संकुल येथे विहार तलावात एक मुलगा पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलासह पोलीसांतर्फे त्याचा शोध सुरू करण्यात आला. नौदलच्या पाणबुड्यांनादेखील घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. ऊशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, सोमवारी सकाळी विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारीही विश्रांती घेतली होती.


६ जुलैपर्यंतचा पाऊस मिमी.

  • कुलाबा ९२८
  • सांताक्रूझ ८९६.२

वार्षिक सरासरी मिमीत

  • कुलाबा २२९२
  • सांताक्रूझ २६६८

गेल्या २४ तासांत मनपाच्या स्वयंचलित केंद्रावरील पाऊस मिमीत.

  • शहर २८.४२
  • पूर्व उपनगर ८५.६०
  • पश्चिम उपनगर ७७.९२

१ ते ५ जुलैपर्यंतचा पाऊस टक्क्यांत

  • पालघर : उणे ११ टक्के
  • ठाणे : ४२ टक्के
  • रायगड : २४ टक्के



हेही वाचा -

Amitabh Bachchan's Jalsa Bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात

Vasai Virar Nalasopara Containment Zones List : 'हे' आहेत वसई, विरार, नालासोपारातील कंटेन्मेंट झोन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा