Advertisement

मुंबई गारठली, डिसेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद


मुंबई गारठली, डिसेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद
SHARES

मुंबईकरांनी गुरूवारी डिसेंबरमधील सर्वात कमी तापमान अनुभवलं. सरासरी तापमानापेक्षा गुरूवारी शहरातील तापमान तब्बल ५ अंशांने घटून १२.४ डिग्री सेल्सिअसवर आलं. तर कमाल तापमान देखील ३ अंशांने कमी म्हणजेच २९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं.

३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्या (IMD)ने वर्तवली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचं प्रमाण वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात घट झाली आहे.

मुंबईसोबत नाशिक, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यांमध्येही पारा कमालीचा खाली घसरला आहे. या परिसरात तर पारा १० ते १५ अंश सेल्सिअसने घसरला आहे. पुढच्या काही दिवसांत पाऱ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा