Advertisement

mumbai rains: मुंबईत ४ दिवस 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'

मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

mumbai rains: मुंबईत ४ दिवस 'ऑरेंज अ‍ॅलर्ट'
SHARES

मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळाधार पावसाची शक्यता आहे. पुढील ४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, भारतीय हवामान विभागानं सोमवारी पुन्हा रत्नागिरी व आसपासच्या भागांसाठी रेड अलर्ट जारी केला. तसंच, १३ ते १५ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र पुढच्या २ दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवून हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसरासाठी 'रेड अ‍ॅलर्ट' जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, राजापूर, लांजा परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसानं जोर धरला आहे.

दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अधूनमधून विश्रांती घेऊन पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा