Advertisement

पुढच्या ५ वर्षांत मुंबईतील महत्त्वांच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक बांधणार- आदित्य ठाकरे

मुंबईतील महत्त्वांच्या मार्गांवर पुढील ५ वर्षांत सायकल ट्रॅक तयार करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुढच्या ५ वर्षांत मुंबईतील महत्त्वांच्या रस्त्यांवर सायकल ट्रॅक बांधणार- आदित्य ठाकरे
SHARES

वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणं अपेक्षित असल्याने जंक्शनदरम्यानच्या रस्त्यांवर सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्र इत्यादी सुविधा मुंबई महानगर विकास प्राधिकरणा (mmrda)कडून उभारण्यात येत आहेत. याचप्रकारे मुंबईतील महत्त्वांच्या मार्गांवर पुढील ५ वर्षांत सायकल ट्रॅक तयार करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन,बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचं लोकार्पण तसंच स्मार्ट वाहनतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधांचा वापर करण्यात येत आहे. चालणाऱ्यांसाठी पदपथ महत्त्वाचे असतात. त्याचीही उभारणी करण्यात येत आहे. सायकल ट्रॅकही उभारण्यात येणार आहे. याचप्रकारे आणखी एक सायकल ट्रॅक पश्चिम द्रुतगती मार्गावर (WEH) देखील बनवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका (bmc) एकत्रितपणे एस.व्ही. रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, एलबीएस रोड या शहरांतील मुख्य रस्त्यांवर पुढील ५ वर्षांत विविध सोयी उभारणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- मुंबईचा सुनियोजित विकास करणार- उद्धव ठाकरे

एमएमआरडीएची मुंबईत होत असलेली पायाभूत सुविधांची कामे आव्हानात्मक आहेत. कारण यातील अनेक कामे दाट लोकवस्तीत होत आहेत. या कामांमुळे स्थलांतरित होत असलेल्यांचं पुनर्वसन याच भागात करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना ‘इज आँफ लिव्हिंग’चा अनुभव घेता आला पाहिजे या दृष्टीने पर्यावरणाचं रक्षण करत या सर्व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचं आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी सांगितलं.

शिवडी ते वरळी उन्नतमार्ग

मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मुंबई बाजूकडील वाहतूक विकीरण व्यवस्थेकरिता शिवडी ते वरळी उन्नतमार्ग प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात आलं आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पावरुन येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोहचून वांद्रे – वरळी सागरी सेतूने वांद्रे येथून पश्चिम उपनगरांकडे जाता येईल. प्रस्तावित उन्नत मार्गाची लांबी सुमारे ४.५ कि.मी इतकी आहे.  

वांद्रे- कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन

वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणं अपेक्षित आहे. जंक्शनदरम्यानच्या  रस्त्यांवर  सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्र इत्यादी सुविधा वाढविणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, बोलाड्स, वाहतूक चिन्हफलक इत्यादीसह स्ट्रीट फर्निचर इ.ची तरदूत करण्यात आली आहे.

हेही वाचा- एसआरएची घरं ५ वर्षानंतर विकता येणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा