Advertisement

एसआरएची घरं ५ वर्षानंतर विकता येणार

एसआरएच्या अंतर्गत बांधण्यात आलेली घरे विकण्याच्या कालमर्यादेबाबत निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

एसआरएची घरं ५ वर्षानंतर विकता येणार
SHARES

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरए अंतर्गत मिळालेली घरं आता ५ वर्षांनंतर विकता येणार आहेत.  एसआरएच्या अंतर्गत बांधण्यात आलेली घरे विकण्याच्या कालमर्यादेबाबत निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. एसआरए प्रकल्पातील घरे दहा वर्षांच्या आत विकता येत नाहीत.  तसा प्रयत्न केलाच तर घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यामुळे ज्यांना पैशाची गरज असते त्यांची मोठी अडचण होत असते. मात्र, आता ही कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयाअंतर्गंत घर विकण्याची १० वर्षांची मर्यादा पाच वर्षे करण्यात येणार आहे.

 एसआरएची घरे विकण्याची कालमर्यादा कमी करण्यात येणार असली, तरी सध्या १० वर्षांच्या आत एसआरएची घरे विकणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. न्यायालयाचा अवमान होऊ नये, म्हणून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत २७ तारखेला राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. मात्र, यानंतर एसआरएमधील घरे पाच वर्षांच्या कालमर्यादेनंतर विकता येणार आहेत, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.



हेही वाचा -

कोरोनामुळं महापालिकेतील 'इतक्या' अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू

गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात होणार बदल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा