
पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. आता नागरिकांना त्यांच्या परिसरातील कचरा साचणारी ठिकाणे आणि डम्पिंग हॉटस्पॉट्सची तक्रार ‘mumbai Clean League’ प्लॅटफॉर्मवर करता येणार आहे.
सर्वप्रथम नागरिकांनी Mumbai Clean League वेबसाइटवर मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी.
त्यानंतर नाव, पत्ता, पिनकोड आणि वॉर्ड क्रमांक यासारखी माहिती भरावी.
स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या “Garbage Hotspot” पर्यायावर क्लिक करावे.
“Register Hotspot” पर्याय निवडून तक्रार नोंदवावी.
परिसराचे नाव, वॉर्ड क्रमांक आणि जवळचा लँडमार्क याची माहिती द्यावी.
नागरिकांना कचऱ्याच्या ठिकाणाचे फोटो अपलोड करण्याची आणि अतिरिक्त माहिती लिहिण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
तक्रार नोंदवल्यानंतर बीएमसीकडून त्या ठिकाणी स्वच्छता आणि कचरा उचलण्याची कारवाई केली जाईल.
The garbage vulnerable points (hotspots) in your locality can now be reported to us through the Mumbai Clean League.🧹🗑️
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 5, 2026
🔗For this, register on the Mumbai Clean League website and share complete details.
🔹Your small effort can bring about a big change in keeping Mumbai clean.… pic.twitter.com/hDnHsSuS6l
महापालिकेने शहरभरातील 162 कचरा साचणारी संवेदनशील ठिकाणे ओळखली आहेत. वारंवार स्वच्छता मोहीम राबवूनही या ठिकाणी पुन्हा कचरा जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही ठिकाणे तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींमधून ओळखण्यात आली आहेत.
महापालिकेने संबंधित वॉर्ड कार्यालयांना तातडीने ही ठिकाणे साफ करण्याचे आणि पुन्हा बेकायदेशीर डम्पिंग होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. काही भागांमध्ये सामुदायिक कचरापेट्यांची कमतरता असल्याने नागरिकांकडून निर्धारित ठिकाणांबाहेर कचरा टाकला जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
यासाठी आता वॉर्डनिहाय लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त भूषण गगरानी (Bhushan Gagrani) यांच्या स्तरावर प्रत्येक वॉर्डाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. वॉर्डनिहाय तपासणीत काही भागांमध्ये तब्बल 28 कचरा हॉटस्पॉट्स आढळले. तर बांद्रा पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम येथे प्रत्येकी पाच संवेदनशील ठिकाणे नोंदवली गेली आहेत.
हेही वाचा
