Advertisement

नवी मुंबई सायक्लॉथॉन २८ फेब्रुवारीला

सायक्लोथॉन आधी २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही सायक्लोथॉन २१ ऐवजी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

नवी मुंबई सायक्लॉथॉन २८ फेब्रुवारीला
SHARES

माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश आणि सायकलसारख्या इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहनाचा वापर वाढवून प्रदूषणाला प्रतिबंध घालण्याचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने 'नवी मुंबई सायक्लोथॉन २०२१' चं आयोजन करण्यात आलं आहे.

सायक्लोथॉन आधी २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही सायक्लोथॉन २१ ऐवजी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.  नवी मुंबईचा क्विन नेकलेस मानल्या जाणाऱ्या पामबीच रोडवर २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता 'नवी मुंबई सायक्लोथॉन २०२१' ची सुरूवात महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळून होणार असून वाशीच्या दिशेने मोराज सर्कल, सानपाडा इथपर्यंत जाऊन पुन्हा महानगरपालिका मुख्यालय प्रवेशव्दारासमोर सांगता होणार आहे.

११ वर्षावरील नागरिकांना या सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेता येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी https:/forms.gle/GHZv1ACGXaxArepj7 या संकेतस्थळावर आपल्या नावाची २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणं आवश्यक आहे. यापूर्वी २१ तारखेसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांनी पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज असणार नाही. 

सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला माझी वसुंधरा अभियानाचे आकर्षक टी-शर्ट व कॅप महानगरपालिकच्या वतीने देण्यात येणार आहे.सायक्लोथऑनमध्ये सहभागी होण्याकरिता नोंदणी केलेल्या व्यक्तींनी २८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील सायक्लोथॉन प्रारंभस्थळाठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. ही सायक्लॉथ़ॉन यशस्वीरित्या पूर्ण करणा-या सहभागींना मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा