Advertisement

मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरून पालिकेवर टीका

खाजगी कंपनीनं आतापर्यंत केवळ १० टक्केच कचऱ्याची व्हिलेवाट लावली आहे. यामुळे पालिकेवर टीका केली जात आहे.

मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरून पालिकेवर टीका
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं २०१८ मध्ये मुलुंड इथलं डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेली अनेक वर्षे या डम्पिंग ग्राऊंडवरील साचलेल्या कचऱ्याची व्हिलेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न होता.

पण कचऱ्याची व्हिलेवाट लावण्याचं कंत्राट त्यांनी एका खाजगी कंपनीला दिलं. पण खाजगी कंपनीनं आतापर्यंत केवळ १० टक्केच कचऱ्याची व्हिलेवाट लावली आहे. यामुळे पालिकेवर टीका केली जात आहे.

पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, बायोमिनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं आतापर्यंत केवळ १ लाख १४ हजार मेट्रिक टन कचऱ्याची व्हिलेवाट लावली आहे. पण कंपनीला पाच वर्षांच्या कालावधीत ११ लाख २० हजार मेट्रिक टन कचऱ्याची व्हिलेवाट लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. पण आतापर्यंत केवळ १० टक्केच काम झालं आहे.

कंपनीच्या कामाचा वेग पाहता आता पालिकेवर विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. कंत्राटदार काम करण्यास वेळ लावत असल्यानं त्याच्यावर कारवाईची मागणी देखील विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये, प्रशासनानं ६ वर्षांच्या कालावधीत अंदाजे ७३१ कोटी खर्च करून बायोमिनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला नियुक्त केले. तथापि, COVID-19 संबंधित निर्बंधामुळे कंपनीनं एप्रिल २०२० पासून साइटवर काम करणं थांबवलं आहे.

“डिसेंबर २०१८ पासून घनकचरा व्यवस्थापनाच्या महत्त्वपूर्ण विषयावर पालिकेला अपयश आलं आहे. डम्पिंग ग्राऊंड संदर्भात पालिकेकडे स्पष्ट दृष्टिकोन नाही. मुलुंड किंवा देवनार असो, सर्व ठिकाणी तीच परिस्थिती आहे, ”अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार आणि नगरसेवक रईस शेख यांनी दिली.

त्यास उत्तर म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे (प्रकल्प) मुख्य अभियंता सुनील घाडगे म्हणाले, “२२ मार्च २०२० नंतर COVID 19 मुळे लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून हे काम थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे कंत्राटदारावर कारवाई करण्याचा प्रस्ताव नाही. आम्ही त्याला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमधील कचरा देवनार आणि कांजूरमार्ग इथल्या डम्पिंग यार्डमध्ये पाठवला जात आहे. मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज एक हजार ते दोन हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात होता. पण आता हे डम्पिंग ग्राऊंड कचरा टाकण्यासाठी बंद आहे.

हे प्रकरण आपण पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे उपस्थित करणार असल्याचं मुलुंडमधील भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितलं आहे. “डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक मोठी गंमतच आहे. साइटवर कोणतेही काम चालू नाही. असं दिसून येतंय की मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा विषय वाऱ्यावर सोडून दिला आहे,” असं मिहीर कोटेचा म्हणाले.हेही वाचा

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा

नवी मुंबई : दर आठवड्याला खारफुटी जंगलातून निघतोय २०० किलो कचरा

Read this story in English
संबंधित विषय