Advertisement

मुंबईत पुढील २ ते ३ तास मुसळधार पाऊस, १४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट

आज सकाळी 11:44 वाजता 4.68 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुढील २ ते ३ तास मुसळधार पाऊस, १४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट
SHARES

मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मुंबईत आणि उपनगरात पाऊस सुरू आहे.

हवामान विभागने आज (बुधवार १३ जुलै) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसची शक्यता वर्तवली आहे. सकाळचे काही तास या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. IMD कडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसलीकर यांनी ट्वीट करत मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली. ”ताज्या सॅटेलाईट आणि रडारचे निरीक्षण केल्यास मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास या भागांत जोरदार पाऊस पडेल.” असे ट्वीट केएस होसलीकर यांनी केले आहे.

मुंबईत 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत सलग 6 दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त लाटा उसळण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास पेक्षा जास्त असेल. आज सकाळी 11:44 वाजता समुद्रात 4.68 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मुंबईत सकाळी 10 वाजल्यानंतर नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी नाही. मुसळधार पावसाच्या सूचना पालिकेने जारी केल्या आहेत. मुंबईत मंगळवार रात्री अधूनमधून पाऊस पडत होता. आज सकाळपासून काही भागात हलका पाऊस पडेल.

बुधवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे. पाणी साचत असलेल्या भागात वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार दिनांक 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहे.



हेही वाचा

पावसाचा कहर, OYO ची भन्नाट ऑफर! दरात 60% पर्यंत कपात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा