Advertisement

प्लास्टिकमुक्त मुंबईत प्लास्टिकचा सर्रास वापर

प्लास्टिक विक्री व वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी दुकाने व आस्थापना विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

प्लास्टिकमुक्त मुंबईत प्लास्टिकचा सर्रास वापर
SHARES

प्लास्टिकमुक्त मुंबई’ असा गाजावाजा मुंबई (mumbai) महापालिका (bmc) प्रशासनाकडून करण्यात आला.

यासाठी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक (plastic) पिशव्यांची विक्री व वापर करणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाने कारवाईचा बडगा उगारला.

मात्र, आजही प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर बेधडक सुरू आहे. 23 जून 2018 ते 31 मार्च 2026 पर्यंत 29 लाख आस्थापनांची झाडाझडती घेतली असता 1 लाख 19 हजार 437.84 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

तसेच 9 कोटी 21 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी विभाग स्तरावर 24 जणांची टीम कार्यरत आहे.

26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या पुराला प्लास्टिक पिशव्या (कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री खरेदी करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात करण्यात आली.

मात्र, आजही फेरीवाले, व्यापारी, दुकानदारांबरोबरच ग्राहकांकडूनही प्लास्टिकचा वापर केला जातो. सणासुदीत तर हा वापर अधिकच होतो.

प्लास्टिक विक्री व वापराचे प्रमाण कमी करण्यासाठी दुकाने व आस्थापना विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्याचा वापर, साठवणूक, वितरण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, तसेच दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी 25 हजार रुपये दंड आकारणी केली जाते.

तसेच तीन महिने कारावासाची तरतूदही कायद्यात आहे. तरीही प्लास्टिक विक्री आणि वापर सर्रास होत असल्याचे कारवाईनंतर स्पष्ट होते.



हेही वाचा

मुंबईत 20 मिनिटांत 32 किमीचा ग्रीन कॉरिडॉर

मुंबईत जवळपास 827 इमारती अतिधोकादायक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा