Advertisement

‘स्पॅरोज शेल्टर'कडून 'चिमणी वाचवा'चा संदेश


‘स्पॅरोज शेल्टर'कडून 'चिमणी वाचवा'चा संदेश
SHARES

वरळी - जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेच्या वतीने 'चिमणी वाचवा' हा संदेश देण्यात आला. 'चिमणी वाचवा' हा संदेश सतत लोकांच्या स्मरणात रहावा यासाठी या संस्थेकडून वारंवार नवनवे प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून 20 मार्च ला मुंबईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल असा आकर्षक देखावा संस्थेच्या वतीने तयार करण्यात आला होता. संस्थेने तयार केलेला 'चिमणी वाचवा'चा देखावा मुंबईभर फिरवण्यात आला.

या देखाव्यासाठी एका कारवर रथ तयार करण्यात आला होता. चिमणी प्रतिकृतीचे आकर्षक फुगे लावण्यात आले आहेत. सोबतच 'सेव्ह स्पॅरो' हा संदेश सुद्धा देण्यात आला.

ही प्रबोधन शोभायात्रा मरीन लाईनपासून वरळी सी फेसपर्यंत सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत काढण्यात आली होती. या आकर्षक देखाव्याचा मुंबईकरांनीही आनंद घेतला. लहान मुलांना चिमणी विषयी असलेले आकर्षण तीच्या प्रति असलेले प्रेम आणि बच्चे कंपनीमध्ये याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी हा प्रांजळ हेतू यामागे होता. यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक प्रमोद माने हे संस्थेच्या अनेक सदस्यांसह सहभागी झाले होते. यावेळी शहरात जागोजागी सदर चिमणीची प्रतिकृती थांबवून लोकांना परिपत्रकाचे वाटप करुन चिमणी वाचवा हा संदेश संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा