झाडं उठली घरांच्या मुळावर

 Dalmia Estate
झाडं उठली घरांच्या मुळावर
झाडं उठली घरांच्या मुळावर
झाडं उठली घरांच्या मुळावर
झाडं उठली घरांच्या मुळावर
See all

म्हाडा कॉलनी - मुलुंडमधल्या म्हाडा कॉलनीतील चाळ क्रमांक 33, 34 आणि 35 इथल्या घरांच्या भिंतींना लागून झाडं वाढली आहेत. याचा त्रास इथे राहणाऱ्या स्थानिकांना होत आहे. या झाडांमुळे इथल्या घरांचं नुकसान होत आहे. या मुळांमुळे घरातील फरश्या सैल होऊन माती आणि पावसाळ्यात गांडूळंही घरात येतात. वृक्षांच्या फांद्यांमुळे घरांच्या छताचं देखील नुकसान होत आहे. या रहिवाश्यांनी नगरसेवक नंदकुमार वैती यांच्याकडे तक्रारही केली. पण, तरीही याविषयी काहीच ठोस पाऊस उचललं जात नसल्याची तक्रार रहिवासी साक्षी सुर्वे यांनी केली आहे.

 

Loading Comments