झाडांसाठी गावकऱ्यांचा आक्रोश

आझाद मैदान - ज्येष्ठ अभिनेते आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पांढरवाडी येथे लावण्यात आलेल्या  २५ हजार झाडांपैकी जवळपास 60 झाडांची कत्तल करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र या वृक्षतोडीच्या निषेधार्थ पांढरवाडी आणि परिसरातील चार गावांतील ग्रामस्थांनी आझाद मैदानात गुरुवारी आंदोलन केलं. दरम्यान, पांढरवाडी गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत या तिघांवर कठोर कारवाईची मागणी केलीय. जलयुक्त शिवार अभियानाच्या निमित्तानं संपूर्ण गाव वृक्षारोपणासाठी एकवटलं. पण, ज्यांच्यावर झाडं तोडण्याचा आरोप होत आहे ते आप्पा मदने आणि त्यांच्या मुलांनी या उपक्रमात कधीच सहभाग घेतला नव्हता. राज्य शासनानं वन सप्ताह दिनाचं औचित्य साधून राज्यात 2 कोटी झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. पण तो यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येकाचीच मानसिकता बदलण्याची गरज आहे.

Loading Comments