जाहिरात क्षेत्रातील कल्पक करिअर

Mumbai
जाहिरात क्षेत्रातील कल्पक करिअर
जाहिरात क्षेत्रातील कल्पक करिअर
जाहिरात क्षेत्रातील कल्पक करिअर
See all
मुंबई  -  

आतापर्यंत तुम्ही 'हुशार मुलांची शाळा' हे वाक्य अनेकदा ऐकले असेल. त्यामुळे नापासांची शाळा, टपोरी मुलांची शाळा, बॅकबेंचर्सची शाळा हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य होईल. पण खरं आहे. जाहिरात क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तीमत्त्व शशिकांत गवळी यांनी अशी शाळा सुरू केली असून ते या शाळेत नापास झालेल्या किंवा करिअर निवडीच्या गोंधळात सापडलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या ‘मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टाइझ अॅण्ड आर्ट’द्वारे नापास मुलांना मार्गदर्शन करण्यात येते.

यंदाही मंथन आर्ट स्कूलतर्फे 27 ते 29 मे दरम्यान कला दालन सभागृह, पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे 'अॅडव्हर्टाइझिंग क्रिएटिव्ह करिअर गाइडन्स 2017' या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बारावी पास - नापास, ग्रॅज्युएट असूनही भविष्यातील करिअरच्या निर्णयापर्यंत न पोहोचलेल्या, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कला शाखेतील वास्तव व जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.

सोबतच अप्लाइड आर्ट, फिल्म्स, ग्राफिक्स डिझाईन, फोटोग्राफी, अॅनिमेशन, फॅशन, यूआय- यूएक्स यांसारख्या हमखास नोकरीची खात्री असलेल्या विविध विषयांची माहिती विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात देण्यात आली.

शशिकांत गवळी, तुषार मोरे, अनंत बोवलेकर यांसारख्या नामांकीत व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना या कार्यक्रमात मिळाले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.