लहान मुलांना आधारकार्डचं वाटप


SHARE

बोरिवली - बालदिनानिमित्त नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी त्यांच्या गोराईमधल्या कार्यालयात आधारकार्ड कॅम्पचं आयोजन केलं होतं. या बालगोपाळाना शाळेमध्ये आधारकार्ड सक्तीचं केल्यामुळे पालकांच्या मागणीनुसार बालदिनाचे औचित साधून आधारकार्ड कॅम्प ठेवण्यात आला. या वेळी १०० ते १५० लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यात आले. तसंच लहान मुलांना चॉकलेट देऊन त्यांच्याबरोबर बालदिन साजरा करण्यात आला. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या