Advertisement

बिग बॉसच्या प्रेक्षकांना बिचुकलेचा नमस्कार

वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून काही नव्या-जुन्या सदस्यांची एंट्री झाल्यानंतर पोलिस कोठडीतून बाहेर पडलेला अभिजीत बिचुकलेही याच वाटेनं परतणार आहे.

बिग बॉसच्या प्रेक्षकांना बिचुकलेचा नमस्कार
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामधून माधव देवचक्के बाहेर पडला आहे. त्याला दिलेल्या विशेष अधिकारानं त्यानं नेहाला पुढील आठवड्यासाठी सेफ केलं आहे. माधवच्या जाण्यानं नेहा आणि शिवानीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्यानं आता नेहा आणि शिवानीची काय योजना असेल? हे पहायचं आहे. आजवर सेफ खेळणारा माधव एका दरवाज्यानं बाहेर पडला आहे, तर दुसऱ्या दरवाज्यानं केवळ या घरातीलच नव्हे तर व्यावहारीक जीवनातही वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच अभिजीत बिचुकलेची घरवापसी होणार आहे.


हुकूमी एक्का 

चेक बाऊंस प्रकरणी अटक झाल्यानंतर बिचुकले पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार का? या प्रश्नावर चर्चा सुरू होती. काहींचं म्हणणं होतं की बिचुकले आता बाराच्या भावात गेला, पण बिग बॉसच्या घरातील हुकूमी एक्का असलेल्या बिचुकलेचं पुनरागमन नक्की होणार यावर काहीजण ठाम होते. घडलंही अगदी तसंच. वाईल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून काही नव्या-जुन्या सदस्यांची एंट्री झाल्यानंतर पोलिस कोठडीतून बाहेर पडलेला अभिजीत बिचुकलेही याच वाटेनं परतणार आहे.


कोण बिचुकलेशी पंगा घेणार?

ज्या क्षणाची प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण आला असून आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिचुकलेची एंट्री होणार आहे. बिचुकलेच्या एंट्रीनं घरातील समीकरणं बदलणार यात शंका नाही. घरामध्ये आता नवीन ग्रुप तयार झाले असून, नवी नाती तयार झाली आहेत. या सगळ्यामध्ये बिन भाड्याच्या खोलीत राहून आलेल्या बिचुकलेची योजना काय असेल हे पहाणं औत्सुकतेचं ठरणार आहे. बिचुकले कोणत्या ग्रुपमध्ये जाणार? बिचुकलेल्या येण्यानं घरातील वातावरण पुन्हा तापणार यात शंका नाही, पण त्याचा पहिला वाद कोणाशी होणार आणि कोण बिचुकलेशी पंगा घेणार? ते पुढं पहायला मिळणार आहे.


रंगत आणखी वाढणार

बिचुकलेच्या येण्यामुळं बिग बॉसच्या घरातील रंगत आणखी वाढणार आहे. वादविवादांचा हा खेळ पहायला आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही जणू मेजवानीच ठरणार आहे. घरात आल्याबरोबर बिचुकलेनं महाराष्ट्रातील रसिकांना आपल्या शैलीत नमस्कार केला आहे. याशिवाय बिचुकलेची डायलॅागबाजीही पहायला मिळणार आहे. 'अगर मैने एकबार कमिटमेंट कर ली, तो मै खुद कि भी नही सुनता', अशाच काहीशा स्टाईलमध्ये बिचुकलेनं घरामध्ये एंट्री घेतली आहे.



हेही वाचा -

'सुवर्ण' काळाच्या 'सुवर्ण' आठवणी!

मराठीची वारी लंडनच्या दारी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा