Advertisement

'सुवर्ण' काळाच्या 'सुवर्ण' आठवणी!


SHARES

सिनेरसिकांना आता सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या साक्षीनं हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांवर हिंदी सिनेमांची जादू करण्यासाठी शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडच्या वतीनं ‘कमल नहाटा… और एक कहानी’ या चॅट शोची घोषणा केली आहे.

 

हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या ताऱ्यांच्या उपस्थितीत (Living Legends) या शोची घोषणा करण्यात आली. जितेंद्र, जावेद अख्तर, शबाना आझमी, बिश्वजीत, सुभाष घई, प्रेम चोप्रा, पुनम ढिल्लन, संगीतकार प्यारेलालजी, संगीतकार आनंदभाई, बिंदू, जया प्रदा, कामिनी कौशल, अमीन सयानी या दिग्गजांच्या उपस्थितीमुळं ही संध्याकाळच जणू सुवर्णमय बनली. या सर्वांनी हिंदी सिनेमाच्या सुवर्णपर्वाच्या आठवणी जागवल्या. 

गतकाळातील दिग्गज्जांना एका व्यासपीठावर आणण्याच्या मूळ संकल्पनेसह ‘काेमल नहाटा… और एक कहानी’ या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये क्लासिक समजल्या जाणाऱ्या सिनेमांची जादू आजच्या आधुनिक युगातही कशी टिकून आहे, याचा वेध या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे.हेही वाचा-

'टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं

महेश मांजरेकर पुन्हा देणार 'धक्का'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा