Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

महेश मांजरेकर पुन्हा देणार 'धक्का'

११ वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटानं मराठी तिकिटबारीवरची गणितं बदलली होती. त्या 'दे धक्का' चित्रपटाचा सिक्वेल बनवत महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांना धक्का देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

महेश मांजरेकर पुन्हा देणार 'धक्का'
SHARES

११ वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटानं मराठी तिकिटबारीवरची गणितं बदलली होती. त्या 'दे धक्का' चित्रपटाचा सिक्वेल बनवत महेश मांजरेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांना धक्का देण्यासाठी सज्ज झाले आहेत.


३ जानेवारीला प्रदर्शित

मराठी चित्रपटांची सध्या देशातच नाही, तर जगभरात चर्चा आहे. मात्र मराठी चित्रपट स्थित्यंतराच्या काळातून जात असताना महेश मांजरेकर यांच्या 'दे धक्का' या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थानं धक्का दिला होता. कारण या चित्रपटानं २००८ मध्ये दहा कोटींचा व्यवसाय केला होता. आता पुन्हा एकदा ११ वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीला धक्का मिळणार आहे. महेश मांजरेकर नव्या वर्षात 'दे धक्का २' हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ३ जानेवारी ही तारीखही घोषित करण्यात आली आहे. 


लंडनमध्ये चित्रीत

'दे धक्का २' चं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून मांजरेकर आणि त्यांची टीम या चित्रपटाच्या कामानिमित्त लंडन मुक्कामी होती. या चित्रपटाचा काही भाग लंडनमध्ये चित्रीत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मांजरेकर स्वत: भाऊ सुदेश मांजरेकर 'दे धक्का २'चं दिग्दर्शन करणार आहेत. अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि स्कायलिंक एंटरटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाचे यतीन जाधव आणि स्वाती खोपकर निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बट्टीन आणि तबरेट पटेल को प्रोड्यूसर, कर्मिका टंडन आणि विशिष्ठा दुसेजा असोसिएट प्रोड्यूसर आहेत. 


वेलकम टू लंडन

'दे धक्का'मध्ये आपल्या अभिनयानं धमाल उडवणारी मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही 'दे धक्का २'मध्ये दिसेल. मात्र बाकी कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर 'वेलकम टू लंडन' असं म्हटलं आहे. त्यामुळं चित्रपटाचं महत्त्वाचं कनेक्शन लंडनशी असणार हे कळतं आहे. आता ते काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. मात्र, चित्रपटाचं पोस्टर अत्यंत फ्रेश आणि रंजक आहे. त्यामुळे चित्रपटही नक्कीच धमाकेदर असेल यात शंका नाही.हेही वाचा -

'टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं

थिएटरमध्ये जाऊन बघा ‘उरी’ सिनेमाचा मोफत शो, ‘कारगिल विजय दिनी’ सरकारचं गिफ्ट
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा