Advertisement

कोण आहे ‘बिग बॉस’मधील भुंगा?

बिग बॉसचं घर हे जणू एकमेकांना नावं ठेवण्याचं ठिकाणचं बनलं आहे. इथं कधी प्रेमानं एकमेकांना नावं ठेवली जातात, तर कधी द्वेषानं… या घरात अभिजीत बिचुकलेला भुंगा म्हटलं जात आहे.

कोण आहे ‘बिग बॉस’मधील भुंगा?
SHARES
Advertisement

बिग बॉसचं घर हे जणू एकमेकांना नावं ठेवण्याचं ठिकाणचं बनलं आहे. इथं कधी प्रेमानं एकमेकांना नावं ठेवली जातात, तर कधी द्वेषानं… या घरात अभिजीत बिचुकलेला भुंगा म्हटलं जात आहे.


बिचुकलेची काॅपी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य कधी घरातील कॅमेरा, तर कधी एकमेकांना वेगवेगळी नावं ठेवत असतात. ही नावं त्यांच्या वागणुकीनुसार, कधी त्यांच्या बोलण्याच्या पध्दतीवरून, तर कधी त्यांच्या स्वभावरून ठेवली जातात. आता अभिजीत बिचुकलेला घरातील सदस्यांनी सहमतानं एक नाव ठेवलं आहे. बिचुकलेच्या बोलण्याच्या स्टाईलवरून, घरातील वागणुकीवरून नेहेमी चर्चेत असतात. बिग बॉसच्या पहिल्या पर्वातील सुशांत शेलार, मेघा धाडे आणि रेशम टिपणीस यांनी नुकतीच या घराला भेट दिली होती. त्यावेळी रेशमनं बिचुकलेची स्टाईल काॅपी करत इतरांचं मनोरंजन केलं होतं.


कानखजुरा का?

आता बिचुकलेबाबत बोलताना आरोह सांगणार आहे की, सहमतानं तुम्हाला एक नाव ठेवलं आहे. त्यावर शिवानी म्हणाली की, कानखजुरा का? त्यावर आरोह म्हणाला, नाही… भुंगा. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना हे नाव पटलं आहे. आता बिचुकले यावर किती सहमत आहे, त्याचं यावर काय म्हणणं असेल? हे पहायचं आहे. या दरम्यान बिचुकलेचा वीणाबरोबर चांगलाच वाद झाला. मेघा, शिवानी आणि वीणानं त्यांना खडसावलं की, यापुढं कृपयावरून कोणाची लायकी काढू नका. शिवानीच्या सांगण्यावरून बिचुकलेनं वीणाची माफी मागितली; परंतु वीणानं सांगितलं की, यापुढं मी तुमच्याशी नाही बोलणार.हेही वाचा  -

Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी

मराठी कलाकारांचा राष्ट्राभिमान! राष्ट्रगीतासाठी एकवटले ७५ तारे
संबंधित विषय
Advertisement