Advertisement

अनाथांची नाथ बनली तेजस्विनी

वडिलांची शिकवण लक्षात ठेवत त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे चालवणाऱ्या फार कमी व्यक्ती या जगात आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं मात्र हा वसा जपत अनाथांची नाथ बनली आहे.

अनाथांची नाथ बनली तेजस्विनी
SHARES

मदर्स डे किंवा फादर्स डे आला की, सोशल मीडियावर आपल्या माता-पित्यासोबतचे फोटो शेअर करणं हे सध्याचं नवं फॅड आहे, पण काही जण मात्र मानवतेचं नातं जपत आपल्या व्यक्तींपासून दूर असलेल्यांसोबत असे डे साजरे करतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतनं अशाच प्रकारे फादर्स डे साजरा करत अनाहुतपणं एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.


अनाथांची नाथ 

फादर्स डे जवळ आल्यानं त्या दिवशी अनेकजण आपापल्या वडिलांसबोत फोटो शेअर करत त्यांच्याबाबतच्या कृतज्ञेतेच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतील, पण वडिलांची शिकवण लक्षात ठेवत त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे चालवणाऱ्या फार कमी व्यक्ती या जगात आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं मात्र हा वसा जपत अनाथांची नाथ बनली आहे. आज तेजस्विनीचे वडील या हयात नाहीत, पण त्यांची शिकवण लक्षात ठेऊन तेजस्विनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे. 


फादर्स डे वृध्दाश्रमात साजरा 

तेजस्विनीनं नुकताच यंदाचा 'फादर्स डे' मुंबईजवळील एका वृध्दाश्रमात साजरा केला. ग्लॅमर जगतात चमकणारी ही तारका आपल्या या अनोख्या शैलीत फादर्स डे साजरा करण्याबाबत म्हणाली की, माझे वडील आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करायचे. तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना गरजेच्या असलेल्या वस्तू भेट द्यायचे. बाबांनी आमच्यावरही तेच संस्कार केले आहेत. त्यामुळं ते गेल्यावरही मी अनेकदा वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवते. ते आपल्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. ज्यास्त मस्तीखोर असतात, असं मला दरवेळी जाणवतं. यंदा पहिल्यांदाच मी मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात भेट दिली. त्यामुळं तिथल्या वृद्धांचा आनंद द्विगुणित झाला.


हळवा विषय 

आज तेजस्विनीचे वडील या जगात नसले तरी त्यांच्या आठवणींनी तिच्या मनात कायमचं घर केलेलं आहे. आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी जागवताना तेजस्विनी म्हणाली की, माझी आई मला नेहमी म्हणते, तुझे बाबा जाताना त्यांचं रूप तुझ्यात सोडून गेले. मी दिसण्यातच नाही, तर गुणांमध्येही त्यांच्यावर गेले आहे. माझे वडील अत्यंत परखड, स्पष्टवक्ते, रसिक आणि तितकेच मस्तीखोरही होते. बाबा हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहेत. त्यांच्याबाबत किती बोललं तरी कमी पडेल.हेही वाचा -

जॅान-इम्रानसह जॅकी-सुनीलचा 'मुंबई सागा'

टायगर-दिशाचा डान्सिंग व्हिडीओ पाहिला का?
संबंधित विषय
Advertisement