टायगर-दिशाचा डान्सिंग व्हिडीओ पाहिला का?

टायगर श्रॅाफ आणि दिशा पाटणी ही सध्याची बाॅलिवुडमधील हॅाट जोडी मानली जात आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या जोडीचा एक डान्सिंग व्हिडीओवर चांगलाच गाजत आहे.

  • टायगर-दिशाचा डान्सिंग व्हिडीओ पाहिला का?
  • टायगर-दिशाचा डान्सिंग व्हिडीओ पाहिला का?
SHARE

टायगर श्रॅाफ आणि दिशा पाटणी ही सध्याची बाॅलिवुडमधील हॅाट जोडी मानली जात आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या जोडीचा एक डान्सिंग व्हिडीओ चांगलाच गाजत आहे.


मैत्रीपलीकडलं नातं

टायगर श्रॅाफ आणि दिशा पाटणी ही बॅालिवुडमधली लव्हबर्डस जोडी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असते. अनेकदा ही जोडी डिनर आणि लंचसाठी तसंच पार्ट्यांमध्ये बिनधास्तपणे वावरतानाही दिसते. सध्या तरी बेस्ट फ्रेंड असल्याचं सर्वांना सांगणाऱ्या या जोडीनं अद्याप तरी एकमेकांना डेटींग करत असल्याचं उघडपणे कबूल केलेलं नाही, पण त्यांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओज या दोघांमध्ये मैत्रीपलीकडलं नातं असल्याचं सांगण्यासाठी पुरेसे आहेत. 


'बेफिक्रा भी होना जरूरी है...'

नुकत्याच झालेल्या दिशाच्या बर्थडेनिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. टायगरनं मात्र आपल्या या खास मैत्रीणीला विशेष शैलीत सोशल मीडियावर गुलाबी डान्सिंग गिफ्ट दिलं आहे. 'हॅप्पी बर्थडे डी' असं लिहीत त्यानं दिशासोबत डान्स केलेला आपला एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'बेफिक्रा भी होना जरूरी है...' या गाण्यावर टायगर-दिशा ही जोडी विद्युतगतीनं डान्स करताना दिसते. दोघांचंही अफलातून टायमिंग, ताळमेळ आणि जलदगतीनं होणाऱ्या हालचाली अक्षरश: मन मोहतात आणि ही जोडी खऱ्या अर्थानं 'मेड फॅार इच अदर' असल्याचं वाटतं.


 आॅनस्क्रीन केमिस्ट्री

दिशानंही टायगरच्या या पोस्टवर रिप्लाय करत 'थॅक्स यू सो मच टिगी, सो स्वीट आॅफ यू' अशी कमेंट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 'बेफिक्रा...' हे गाणं टायगर आणि दिशा यांच्या 'बागी २' या चित्रपटातील असून, तरुणाईमध्ये चांगलंच पॅाप्युलर आहे. या चित्रपटात दिशा-टायगरची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवायला मिळाली होती. या व्हिडीओच्या शेवटी दोघंही 'तुझसे कहानियां, तुझसे जवानियां...' या गाण्यावर डान्स करताना दिसतात. दोघंही फिटनेसच्या बाबतीत सजग असल्यानं या दोन्ही गाण्यांवर अप्रतिम डान्सची झलक पाहिल्याचं समाधान हा व्हिडीओ पाहिल्यावर मिळतं.

लिंक - https://www.instagram.com/p/Byo6XVMnmDR/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_againहेही वाचा  -

Movie Review : स्त्रीनं स्वगृहाचा घेतलेला शोध

बिग बॉसच्या घरात पाणीबाणी
संबंधित विषय
ताज्या बातम्या