बिग बॉसच्या घरात पाणीबाणी

बिग बॉसचं घरातील सदस्यांचा टास्क हे जणू एक कोडंच आहे. त्यामुळं या घरात कधी कोणता टास्क दिला जाईल आणि ते करताना नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा दिली जाईल याचा नेम नाही. बिग बॉसच्या घरात सध्या पाणीबाणी आहे.

  • बिग बॉसच्या घरात पाणीबाणी
  • बिग बॉसच्या घरात पाणीबाणी
  • बिग बॉसच्या घरात पाणीबाणी
SHARE

बिग बॉसचं घरातील सदस्यांचा टास्क हे जणू एक कोडंच आहे. त्यामुळं या घरात कधी कोणता टास्क दिला जाईल आणि ते करताना नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा दिली जाईल याचा नेम नाही. बिग बॉसच्या घरात सध्या पाणीबाणी आहे.


नेहाविषयी तक्रार 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये काल घरातील सदस्यांनी बरीच धम्माल केली. दिगंबर नाईकला टास्कमध्ये शिक्षक असलेल्या टीमनं पास केलं. वैशाली माडेनं संगीत क्लासमध्ये आपल्या मधुर आवाजात सुंदर गाणी ऐकवली. परागच्या तासात ऐकवलेल्या 'एक प्यार का नगमा है...' या गाण्यामुळं सगळे सदस्य भावूक झाले. अभिजीत केळकरनं बिग बॉसला नेहाविषयी तक्रार केली. शिक्षक झालेल्या टीमनं काल विद्यार्थी बनून बीबी विद्यालयात बराच दंगा केला. अभिजीत बिचुकले यांना इंग्लिश शिकवायची जबाबदारी सोपवली होती आणि या क्लासमध्ये वीणा आणि पराग यांनी बिचुकले यांना त्यांच्या इंग्लिशवरून बरंच चिडवलं. वीणाला काल बिचुकले यांनी, तर नेहानं परागला त्यांच्या क्लासमध्ये दंगा केल्यानं नापास केलं.


नेहाची विनंती

शिवानी सुर्वेनं बिग बॉसना लवकरात लवकर घरामधून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. यावर बिग बॉसनी मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवानीनं कालही बिग बॉस आणि बिग बॉसच्या संपूर्ण टीमची माफी मागितली. आज देखील शिवानी बिग बॉसना हिच विनंती करताना दिसणार आहे. आता बिग बॉस यावर काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल. तसंच बिग बॉस आज घरातील पाणीपुरवठा बंद करणार असून सर्व सदस्यांना घरात असलेला पाणीसाठा स्टोर रूममध्ये ठेवण्यास सांगणार आहेत. आता पाण्याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य कसे राहतात ते पहायचं आहे.


पाणी जपून वापरा

बिग बॉसमध्ये 'पाणी जपून वापरा' हा टास्क रंगणार आहे. महाराष्ट्रातील बरेच जिल्हे पाणी टंचाईच्या भीषण परिस्थितीला सामारे जात आहेत. बिग बॉसच्या घरात २४ तास पाणी पुरवठा होतो; परंतु या परिस्थितीची प्रत्येक सदस्याला जाणीव असणं आवश्यक असल्यानं आज घरात पाण्याचा वापर काटकसरीनं करण्यात येणार आहे. यासाठीच पाण्याचं नियोजन कसं करावं याचा प्रत्यय सदस्यांना येणं महत्वाचं आहे. यासाठॅच पाणी जपून वापरा हे कार्य सदस्यांवर सोपविण्यात येणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये रंगणार आहे. जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल.


नेहा-माधवमध्ये वाद 

बिचुकलेंमुळे नेहा आणि माधवमध्ये वाद होणार आहे. बिग बॉस यांनी घरातला पाणीपुरवठा बंद करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर घरामध्ये गोंधळ उडाला. यामध्ये बिचुकलेंचा गोंधळ वेगळाच. घोषणानंतर बिचूकलेंनी लगेच बिग बॉसना विनंती केली कि, थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी द्यावा. बिचुकले स्टोर रूममध्ये पाणी घेण्यास पोहचले. यावर नेहानं बिचुकलेंना बजावलं, असं करू नका, पण ते ऐकत नाहीत हे बघितल्यावर तिनं माधवला बिचुकले यांना समजविण्याची विनंती केली. माधवनं त्यांना समजावलं. जारमधल सगळं पाणी संपवू नका आणि लगेच तोंड धुवून या, पण तुम्हाला पाणी आत ठेवण्यास परवानगी नाही. बिचुकले यांना माधव समजवत असताना, नेहा पुन्हा मध्ये बोलल्यानं माधवला राग आला आणि त्याचा आवाज चढला. 'मला सांगितलंस ना बोलायला मग मला बोलू दे'.हेही वाचा  -

EXCLUSIVE : … तर ‘टकाटक’साठी मिलिंद चढणार कोर्टाची पायरी!

वीणा-शिव यांच्यात ‘आंखों की गुस्ताखियां…’
संबंधित विषय
ताज्या बातम्या