Advertisement

वीणा-शिव यांच्यात ‘आंखों की गुस्ताखियां…’

मराठी बिग बॉसच्या घरात सुरू असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य खूपचं रंगात आलं आहे. यात आता वादविवादांसोबत हिंदी चित्रपटातील गीतंही ऐकायला मिळत आहेत.

वीणा-शिव यांच्यात ‘आंखों की गुस्ताखियां…’
SHARES

मराठी बिग बॉसच्या घरात सुरू असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य खूपचं रंगात आलं आहे. यात आता वादविवादांसोबत हिंदी चित्रपटातील गीतंही ऐकायला मिळत आहेत.


सुंदर डान्स 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमधून काल शिक्षकांनी शिवानी सुर्वे, विद्याधर जोशी यांना नापास केलं, तर विणानं तिच्या विद्यार्थ्यासोबत सेल्फी काढला. आज देखील हा टास्क रंगणार असून पराग कान्हेरे घेत असलेल्या प्रेमशास्त्र या तासाला सगळ्यांनाच आपलं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. या तासात सगळ्याच सदस्यांनी बाजी मारली आहे. आज या तासाला विणा आणि शिव यांचा ‘आंखो कि गुस्ताखीयां…’ या गाण्यावर सुंदर डान्स बघायला मिळणार आहे. तर माझ्या फोटोवर कोणी नापास लिहायचं नाही, मी कायम पास होते असं शिवानी माधवला सांगताना दिसणार आहे. तिनं तिच्या फोटोवर नापास लिहिलेलं पुसून टाकलं.


रुपालीला नापास करायचंय 

शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये प्रत्येक टीमनं विद्यार्थी झालेल्या सदस्यांना नापास करायचं आहे. यावरून नेहा, शिवानी, अभिजित केळकर, माधव देवचक्के, दिंगबर नाईक, विद्याधर जोशी, अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये मतभेद झालेले दिसणार आहेत. दुसऱ्या टीममधील कोणत्या सदस्याला नापास करायचं हे टीमला सर्वानुमते ठरवायचं आहे. नेहाच्या म्हणण्यानुसार तिला रुपालीला नापास करायचं आहे; परंतु आपल्याकडे रूपालीला नापास करायला काही कारण नसल्याचं अभिजीतचं म्हणणं आहे. माधव, दिगंबर, विद्याधर आणि बिचुकले, अभिजीत यांच्या म्हणण्यानुसार शिव काहीच करत नसल्यानं त्याला नापास करायला हवं. यावर नेहानं नाराजगी व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, बोलायची वेळ येते तेव्हा सगळेच जण हत्यार टाकून बसून जातात.
हेही वाचा  -

ईशा लावणार अपहरण केसचा छडा

सलमाननं घोषित केली 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा