जॅान-इम्रानसह जॅकी-सुनीलचा 'मुंबई सागा'

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांना भाईगिरीचं भारी आकर्षण असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळंच आजवर नेहमीच ब्लॅक अँड व्हाईट युगातील भाईगिरीही रूपेरी पडद्यावर पहायला मिळाली आहे.

  • जॅान-इम्रानसह जॅकी-सुनीलचा 'मुंबई सागा'
SHARE

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शकांना भाईगिरीचं भारी आकर्षण असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळंच आजवर नेहमीच ब्लॅक अँड व्हाईट युगातील भाईगिरीही रूपेरी पडद्यावर पहायला मिळाली आहे.


जुगलबंदी 

मागील काही वर्षांपासून अभिनेता जॅान अब्राहम खूपच मोजके चित्रपट करताना दिसतो. यात काही विनोदी चित्रपटांसोबत गंभीर चित्रपटांचाही समावेश आहे. कधी सैनिक, कधी पोलिस, तर कधी गुप्तहेर बनलेला जॅान आता इमरान हाश्मीसोबतच भाईगिरी करताना दिसणार आहे. 'मुंबई सागा' या आगामी हिंदी चित्रपटात या दोघांसह जॅकी श्रॅाफ आणि सुनील शेट्टी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं जॅान आणि इमरान प्रथमच एकत्र आले आहेत. यापूर्वी दोघांनीही भाईगिरीवर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानं 'मुंबई सागा'मध्ये दोघांची जुगलबंदी पहायला मिळेल असं बोललं जात आहे.


गुन्हेगारी विश्वावर प्रकाश

'वन्स अपॅान टाईम इन मुंबई' तसंच 'दगडी चाळ' या अलिकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी मुंबईतील गँग्ज आणि गँगवॅार्स यांवर प्रकाशझोत टाकण्याचं काम केलं आहे. 'कांटे', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'शूटआऊट अँट वडाला' यांसारखे गॅगस्टर्सवर आधारित चित्रपट बनवणारे दिग्दर्शक संजय गुप्ता आता 'मुंबई सागा' या चित्रपटाद्वारे १९८०-९० च्या दशकातील मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणार आहेत. १९९४ मध्ये 'आतिष' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेल्या संजय गुप्ता यांच्या कारकिर्दीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असल्यानं 'मुंबई सागा' हा चित्रपट त्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.


 पुढल्या वर्षी प्रदर्शित

या चित्रपटात प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोव्हर, रोहित रॅाय आणि अमोल गुप्ते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. भूषण कुमार, किशन कुमार आणि अनुराधा गुप्ता यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं शूटिंग जुलै महिन्यात सुरू होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नसली तरी पुढल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. या मल्टिस्टारर चित्रपटात कोणता कलाकार नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार आहे याबाबत सध्या तरी काहीही सांगण्यात आलेलं नाही. आता केवळ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.हेही वाचा  -

Movie Review : स्त्रीनं स्वगृहाचा घेतलेला शोध

बिग बॉसच्या घरात पाणीबाणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या