आदित्य मेहतांना ह्युमन स्पिरिट पुरस्कार


  •  आदित्य मेहतांना ह्युमन स्पिरिट पुरस्कार
  •  आदित्य मेहतांना ह्युमन स्पिरिट पुरस्कार
SHARE

नरिमन पॉइंट - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या आदित्य जी. मेहता यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ह्युमन स्पिरिट 2016 या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रत्ननिधी संस्थेच्या वतीनं शुक्रवारी संध्याकाळी नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये हा सोहळा झाला.

"जिद्द, चिकाटी परिश्रम करणारे व्यक्ती अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतात. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं, तेव्हा तो खरा आनंद होय. शब्दानं उत्तर देऊ नका तर कृतीनं उत्तर द्या," असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या वेळी उपस्थितांना दिला. तसंच मेहता यांच्या कामाचं या वेळी विशेष कौतुकही करण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या