Advertisement

मनोज कुमार यांना 'सारस्वत रत्न'


मनोज कुमार यांना 'सारस्वत रत्न'
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपटरसिक विसरले नाहीत. चित्रपटरसिकांचे लाडके 'भारत कुमार' येत्या 24 जुलैला वयाची 80 वर्ष पूर्ण करणार आहेत. मनोज कुमार यांच्या कारकिर्दीला सलाम ठोकण्यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना 'सारस्वत रत्न' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 'ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायजेशन'च्या वतीने येत्या 23 जुलैला विलेपार्लेमधील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'मुंबई लाइव्ह' या कार्यक्रमाचे माध्यम सहयोगी असणार आहे. 


चित्रपटक्षेत्रातले योगदान

हिंदी चित्रपटसृष्टीत वो कौन थी, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में सारख्या रोमँटिक किंवा सामाजिक चित्रपटांमधून नायक साकारणारे मनोज कुमार साठ आणि सत्तरच्या दशकात सुपरस्टार्सच्या गर्दीत टिकून राहिले. इथे स्वतःचे वेगळे अस्तित्व ठसवून द्यायचे असेल तर काहीतरी अभिनव करून दाखवायला हवे, या इराद्याने त्यांनी आपल्या करियरचा  'ट्रॅक' बदलला. 'शहीद' सारख्या चित्रपटामधून त्यांनी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आदी क्रांतीकारकांचे जीवनकार्य चित्रपटरुपात आणले. 

साठच्या दशकात देशाचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सूचनेनुसार, 'जय जवान, जय किसान' या नाऱ्यावर आधारीत चित्रपटनिर्मिती करण्याचा विडा त्यांनी उचलला आणि एका पद्धतीने त्यांनी चित्रपटसृष्टीवर 'उपकार'च केले. देशभक्तिपर, सामाजिक चित्रपटांचा त्यांचा सिलसिला सुरूच राहिला. पूरब और पश्चिम, क्रांती, रोटी कपड़ा और मकान सारख्या त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात देशप्रेमाचा अंगार चेतवला आणि मनोज कुमार हे 'भारत कुमार' झाले ते आजतागायत. 



अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, संकलन, गीत लेखन आदी चित्रपटक्षेत्रातल्या विविध प्रांतातली त्यांची मुशाफिरी थक्क करणारी आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाची दखल चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च मानल्या गेलेल्या 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने घेतली गेली.    


आयोजकांबद्दल...

'ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायजेशन' ही संघटना 1972 पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. महाराष्ट्रासह           जम्मू-काश्मिर, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांत सारस्वत समाजातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 


मनोज कुमार सन्मानसंध्या... कधी आणि कुठे?

  • दिनांक - 23 जुलै 2017 (रविवार)
  • ठिकाण - मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू.), मुंबई
  • वेळ - संध्याकाळी 8 वाजता


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा