बिग बॉसला लाज वाटण्यासारखं सदस्यांनी काय केलं?

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. आता या आठवड्यामध्ये बिग बॉस सदस्यांना कुठला टास्क देणार? कोण नॉमिनेट होणार? प्रेक्षकांची मतं कोणाला वाचवणार? हे बघणं रंजक असणार आहे.

  • बिग बॉसला लाज वाटण्यासारखं सदस्यांनी काय केलं?
  • बिग बॉसला लाज वाटण्यासारखं सदस्यांनी काय केलं?
  • बिग बॉसला लाज वाटण्यासारखं सदस्यांनी काय केलं?
SHARE

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या सुरेखा पुणेकर घराबाहेर पडल्या. आता या आठवड्यामध्ये बिग बॉस सदस्यांना कुठला टास्क देणार? कोण नॉमिनेट होणार? प्रेक्षकांची मतं कोणाला वाचवणार? हे बघणं रंजक असणार आहे. 

लक्झरी पदार्थ जप्त

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता टॅाप ९ सदस्य राहिले आहेत; परंतु हे सदस्य टॅाप ९ ठरले असले, तरी बिग बॉस लाज वाटण्याजोगं काहीतरी घडल्याचं जाहिर करणार आहेत. या करीता बिग बॉस सगळे लक्झरी पदार्थ जप्त करणार आहेत. बिग बॉसची ही घोषणा ऐकून सगळ्या सदस्यांनी बिग बॉसची माफी मागितली. तर घराचा कॅप्टन माधवला आता कुठली शिक्षा मिळेल? सदस्यांनी नक्की काय केलं? हे सुद्धा कळेलच. दर आठवड्याला हिना आणि शिवमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण होतच असतं. या आठवड्यातही दोघांमध्ये वाद झाल्याचं चित्र पहायला मिळणार आहे.

शब्दाला शब्द वाढला

हिना वैशालीला सांगत होती की, रुपालीनं मला प्रश्न विचारला आणि मी माईक न घेताच उत्तर दिलं. त्यावर वैशाली म्हणाली की, यासाठी बिग बॉस तुला ओरडले. ती असे देखील म्हणाली की, जी लोक कधीच चूका करत नाहीत, ती माईक विसरायला लागली आहेत. त्यावर शिव म्हणाला की, बापरे माईक विसरलं कोणीतरी. त्यावर हिनानं शिवला सांगितलं की, तू बोलू नकोस. शिव म्हणाला, तुझ्याशी नाही मी वैशालीताईशी बोलत आहे. तू उगाच भांडणाच्या मूडमध्ये नको राहत जाऊस. तू कोण मला सांगणारी बोलू नकोस. त्यावर हिनानंही शिवला उत्तर दिलं की, कारण माझ्याबद्दल हा विषय सुरू आहे आणि मला नाही आवडत तू बोलतो माझ्याबद्दल. त्यानंतर शब्दाला शब्द वाढतच गेला. त्यामुळं आता हा वाद कुठपर्यंत जातो ते पहायचं आहे.
हेही वाचा -

मराठीतला पहिलाच प्रयोग, ३० हून अधिक कलाकारांनी गायलं 'स्माईल प्लीज'चं अँथम साँग

आशाताईंना तोड नाही, ८६ व्या वर्षी गायलं रोमँटीक साँग
संबंधित विषय
ताज्या बातम्या